वाकड येथे मोटार जळून खाक   

पिंपरी : देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर वाकड येथे टीप टॉप इंटरनॅशनल या हॉटेलसमोर एका मोटारकारला आग लागली. यामध्ये मोटारकार पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
 
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे दुपारी दोन वाजता एका मोटारकारला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी पाणी मारून आग विझवली. गाडीमध्ये इलेक्ट्रिक स्पार्क झाल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागल्याचे समजताच चालकाने कार बाजूला घेतली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग हा अतिशय रहदारीचा मार्ग आहे. आगीच्या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. आग विझवल्यावर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
 

Related Articles